Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Ashadhi Ekadashi Marathi Wishes Images ( आषाढी एकादशी मराठी शुभकामना इमेजेस )
धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव,
ह्रदयी पंढरिराव राहतसे…
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
आषाढी एकादशीसाठी स्टेटस
विठ्ठल माझा ध्यास, विठ्ठल माझा श्वास,
विठ्ठल माझा भास, विठ्ठल माझा आभास…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी,
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा,
बहुत सुकृताची जोडी, म्हणूनी विठ्ठल आवडी,
सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर – संत ज्ञानेश्वर
आषाढी एकादशी शुभ मुहूर्तावर,
भगवान विष्णु आपल्या सर्व पापांचा नाश करेल.
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
आषाढी एकादशीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
विठुराया आणि रखुमाईच्या कृपेने सर्वांना सुख, समृद्धी
आणि आरोग्य प्राप्त व्हावे, ही माझी विनम्र प्रार्थना!
रूप पाहता लोचनी, सुख जाले ओ साजणी,
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा,
बहुता सुकृतांची जोडी, म्हणुनी विठ्ठल आवडी,
सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेवीवर।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
पाणी घालतो तुळशीला !
वंदन करतो देवाला !
सदा आंनदी ठेव
माझ्या मित्रांना.
हिच प्रार्थना पाडुरंगाला
सर्वांना
आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.
तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।
घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा।।
राम कृष्ण हरी माऊली।।
‘
सुप्रभात!
बोला पुंडलिक हरी विठ्ठल!!’
मुख दर्शन व्हावे आता ..
तु सकळ जनांचा दाता..
घे कुशीत या माऊली..
तुझ्या चरणी ठेवितो माथा..
माऊली माऊली रूप तुझे
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.
सर्वांना आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.
तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।
घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा।।
राम कृष्ण हरी माऊली।।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
विठ्ठल, विठ्ठल, जय हरी विट्ठल!
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
शुभ आषाढी एकादशी
!!…जय हरी विठ्ठल….!!
विठ्ठलाची ओढ किती गोड गोड
जोडूनिया कर फुले मन
तोच भासे दाता तोची मातापिता
विसर जगाचा सर्वकाळ ….
विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा
हारे चिंता व्यथा क्षणार्धात ….
सोड अहंकार, सोड तु संसार
क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून …
माझे माहेर पंढरी |
आहे भिवरेचे तिरी || बाप आणि आई |
माझी विठ्ठल रखुमाई || पुंडलिक आहे बंधू |
त्याची ख्याती काय सांगू || माझी बहिण चंद्रभागा |
करीत असे पापभंगा || एकाजनार्दनी शरण |
करी माहेराची आठवण ||
!!…..जय हरी विठ्ठल…..!!
!!…जय हरी विट्ठल …!!
सदा पै परिपुर्ण जयाचे रुपडे !
तेथेचि माजीवडे मन करी !!
होईल उद्धार सुटेल संसार !
सर्व मायापुर दुरी होय !!
कांठाळा कायेचा दुरावा मायेचा !
हेचि जप वाचा स्मरे नाम !!
नामा म्हणे करी सर्व हरी हरी !
राम हे उत्तरी वाखाणी पा !!
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।
करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरे ।
परती माघारें घेत नाहीं ॥२॥
बंधनापासुनि उकलल्या गांठी ।
देतां आली मिठी सावकाश ॥३॥
तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें ।
कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥
शुभ आषाढी एकादशी
चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी
दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!!
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल,
तुला साद आली तुझ्या लेकरांची
अलंकापुरी आज भारावली
वसा वारी चा घेतला पावलांनी
आम्हा वाळवंटी तुझी सावली
गळा भेट घेण्या भिमेची निघाली
तुझ्या नामघोषात इंद्रायणी
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल.
देव माझा विठू सावळा
माळ त्याची माझिया गळा
विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी
भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा
साजिरे रूप सुंदर, कटी झळके पीतांबर
कंठात तुळशीचे हार, कस्तुरी टिळा
भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो
रंगून जाई भक्तांचा पाहुनी लळा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!!
आरती विठलरखुमाईची
युगे अटावीस विटेवरी उभा
वामांगीं रखुमाई दिसे दिव्य शोभा |
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ||
चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ||1||
जय देव जय देव जय पांडुरंगा |
रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावें जिवलगा ||
जय देव जय दे || ध्रु ||
तुळसीमाला गलान कर ठेवुनि कटीं |
कासें पीतांबर कस्तुरी लल्लाटीं ||
देव सुरवर नित्य येती भेटी |
गरुड हनुमंत पुढें उभे राहती ||2||
धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाला |
सुवर्णांची कमळ वनमाला गलां ||
राही-रखुमाबाई राणीया सकळ ||
ओंवोलिती राजा विठोभा सांवला ||3||
ओंवालूं आरत्या कुर्वंडया येती ||
चंद्रभागेमाजीं सोडुनियां देती ||
दिडया पताका वैष्णव नाचती |
पंडरीचा महिमा वर्णावा किती ||4||
आषाढ़ी कार्तिकी भक्त्जन येती |
चंद्रभागेमाजीं स्नानें जे करिती |
दर्शनहेलामात्रें तयां होय मुकती |
केशवासी नामदेव भवें ओवालिती ||5||
जय देव जय दे ||
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts