Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Diwali Marathi Wishes Images ( दिवाळी मराठी शुभकामना इमेजेस )
घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली च्या शुभेच्छा!
आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
दिवाळीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!!!
धनाची पूजा यशाचा प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपूजन संबंधाचा फराळ,
समृद्धी पाडवा प्रेमाची भाऊबीज,
अशा या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
चंद्राचा कंदील घरावरी,
चांदण्यांचे तोरण दारावरी..
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,
दिवाळीचे स्वागत घरोघरी..!!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
स्नेहाचा सुगंध दरवळला..
आनंदाचा सण आला..
एकच मागणे दिवाळी सणाला..
सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना..
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!
नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..
नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..
सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली..
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली..
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!
झगमगत्या दिव्यांनी प्रकाशित दिवाळी आली अंगणी,
धन-धान्य सुख-समृद्धी आणि ईश्वराचा आशिर्वाद घेऊन आली ही दिवाळी.
गोवर्धन पूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंद, उत्साह अन हर्षउल्लासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला,
दिवाळीच्या तुम्हांला मनःपूर्वक शुभेच्छा!
जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
गेले काही दिवसांचे
अंधारमय अनुभव पुसून टाका,
नवा प्रकाश, नव्या उर्जामय आठवणी घेऊन
ही दिवाळी साजरा करा…
सर्वांना दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छा!!
हसत राहा, हसता हसता दिपक लावा, जीवनात नवे आनंद आणा,
दुःखक विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा.
दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
शुभ दिपावली
चारी दिशांत ताऱ्यांचा झगमगाट
सगळीकडे आनंदाच उल्हास
लक्ष्मीची पावले पडावी तुमच्या घरात
अशी व्हावी शुभ दीपावलीची सुरुवात
शुभ~दिपावली
सगळा आनंद सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे,
सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे,
ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…
दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण…
दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!
यशाची रोषणाई
कीर्तीचे अभ्यंग स्नान
मनाचे लक्ष्मिपुजन
समृद्धीचे फराळ
प्रेमाची भाऊबीज
अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा
लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश…
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश…
मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश…
असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळ सण खास!!!
दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा
जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असून,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
धनाची पूजा, यशाचा प्रकाश
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लाक्ष्मीपूजन
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब सह परिवारास सोनेरी शुभेच्छा !!!
दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण…
शुभ दिपावली
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा,
सरस्वतीपूजा व दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्हासला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर
धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली!
दीपावलीच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दिप उजळू दे,लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख समॄध्दीने भरू दे.
शुभ दिपावली!
शुभ सकाळ..! शुभ दिपावली..! \
नवी स्वप्ने नवी क्षितिजे,
घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना,
दिव्ययशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो,
ही दिवाळी…
दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची
ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता,
आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दिपावली सारख्या मंगल प्रसंगी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.
शुभ दिपावली!
ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख-समृध्दी घेऊन येवो!
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दीपावलीच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती.!
!!.दिपावलीच्या हार्दिक शुभेछा.!! 🙂
सुख, शांति, समाधान, समृद्धि…
हैप्पी दीपावली
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts