Diwali Messages In Marathi

Diwali Messages In Marathi
✐ सगळा आनंद सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे,
सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे,
ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…

✐ दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण…

✐ धन त्रयोदशी !!
नरक चतुर्दशी !!
लक्ष्मी पूजन !!
बलि प्रतिपदा !!
भाऊबीज !!
आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो…
शुभ दीपावली!

✐ जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असून,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

✐ लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश…
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश…
मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश…
असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळ सण खास!!!
दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…

✐ यशाची रोषणाई
कीर्तीचे अभ्यंग स्नान
मनाचे लक्ष्मिपुजन
समृद्धीचे फराळ
प्रेमाची भाऊबीज
अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा

✐ फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दिपावली सारख्या मंगल प्रसंगी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.
शुभ दिपावली!

✐ दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली
सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

✐ चारी दिशांत ताऱ्यांचा झगमगाट
सगळीकडे आनंदाच उल्हास
लक्ष्मीची पावले पडावी तुमच्या घरात
अशी व्हावी शुभ दीपावलीची सुरुवात
शुभ~दिपावली

✐ धनलक्ष्मी,
धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी,
शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी,
राजलक्ष्मी…
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
सम्रुद्धीची व भरभराटिची जावो…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…

✐ स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

✐ पहिला दिवा लागेल दारी,
सुखाचा किरण येईल घरी,
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

✐ पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

✐ आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ,
हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

✐ दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
शुभ दिपावली!

✐ दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

✐ लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

✐ नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

✐ दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

✐ समृध्दीच्या कणाकणात सजावी, नटावी दीपावली..!!
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे..!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!!
शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे अंगण तुमचे भरावे..!!
!! शुभ दीपावली !!

✐ फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

✐ तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

✐ यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके,
येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!
दिवाळीच्या सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!

✐ दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !

✐ गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्हासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!

Leave a comment