Makar Sankranti Marathi Messages

Makar Sankranti Marathi Messages
✍️ गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

✍️ गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवापणा बाहेर पडू द्या…
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या….
गोड गोड मित्रांना!!!!
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा …

✍️ एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला
हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला..

✍️ आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुलाचा गोड़वा,
स्नेह वाढवा…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”

✍️ फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून
कितीही दूर असलात तरी,
मकरसंक्रांत सारख्या मंगलप्रसंगी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.!
तिळ गुळ घ्या गोड गोड बोला

✍️ पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला-पावलावर भेटतात
पण मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात
अशाच सोन्यासारख्या माणसांना
मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा

✍️ परक्यांना ही आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परिवाराला
मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा

✍️ म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज
********************­*****
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
********************­*****

✍️ नभी उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,
आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग….
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

✍️ कणभर तिळ मणभर प्रेम
गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला….
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा

✍️ नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
प्रियजनांना
गोड व्यक्तींना
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

✍️ तुमच्या यशाची पतंग
उचंच उंच उडत रहावी हीच सदिच्छा
मकर संक्रांति च्या हार्दिक शुभेच्छा!

✍️ दिवस संक्रांतीचा
मधुर वाणीचा
रंग उडत्या पतंगाचा
बंध दाटत्या नात्यांचा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a comment