Marathi Love Shayari

✐ सगळ्यांनाच सगळं सांगायचे नसते,
पण जो आपल्या भावना
शब्दांविना समजुन घेतो,
त्याच्यापासुन काही लपवायचे देखील नसते…

✐ तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही,
डायमंड नाही, आहेत ते फक्त चार शब्द
तुझ्याशिवाय मला राहवत नाही..

✐ दिवस मावळला पण
लिहावयास काहीच सुचले नाही..
मनात फक्त तुझी आठवण
होती बाकी मनाला काहीच रुचले नाही..

✐ शेवटी जाता जाता एकच सांगून जातो…
मी मेल्यानंतर मला बघायला नको येऊ…
कारण तूला रडतेवेऴेस मला बघावस वाटत नाही…
माझ्यासाठी फक्त एकच कर,
मला वाईट समजू नको …कारण माझ्याकडे दूसरा पर्याय नाही…
शेवटचा Love u….Good by…
काळजी घे स्वत:ची….

✐ अश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे,
काही कारणामुळे अश्रू डोळ्यातून बाहेर येतात….
ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहात पण कारण
नसतानाही जेव्हा अश्रू येतात…
ह्याचा अर्थ तुम्ही प्रेमात आहात !!!

✐ हसून पहावं रडून पहावं
जीवनाकडे नेहमी डोळे भरून पहावं
काहीतरी द्यावं काहीतरी घ्यावं
आपण गेल्यानंतर आपल नाव कुणीतरी काढावं
प्रेम देशावर करावं, धर्मावर करावं
माणसावर करावं, माणूसकीवर करावं
पण ………
प्रेम मात्र मनापासून करावं.

✐ वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन

✐ प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे…

✐ विखुरलय मी माझं प्रेम,
तुझ्या सर्वच त्या वाटावरती..
लहरू दे नौका तुझ्याही भावनांची,
स्वैर उधाणलेल्या
माझ्या हृदयाच्या लाटांवरती..

✐ शब्दांच्या जाळ्यात तुझ्या मला आता फसायचं नाही
कीतीह प्रयत्न केलास तरी मी,
ठरवलं तुझ्या कोणत्याही बोलण्यावर हसायचं नाही.

✐ हळू हळू तुझे सारे घाव
मिटत आहेत माझ्या हॄदयावरून
दिसत आहे पून्हा प्रेम मला
कागदावर कवितेच्या उदयावरून

✐ अगं वेडे….
मी तुझ्या शिवाय कुणाला चॉकलेट पण देणार नाही…
मग हृदय तर खुप लांबची गोष्ट आहे…!!!

Leave a comment