Kojagiri Purnima Messages In Marathi

कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा संदेश

✐ हे दूध केशरी, कोजागिरीचे खास
वेलची, बदाम अन् पिस्ते खारे साथ
प्रार्थितो शरद पौर्णिमा शंभर, अशा निवांत
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

✐ प्रत्येकाचा जोडीदार, ज्याचा त्याचा चांदोबा असतो,
परिस्थितीनुसार ससा, तर कधी वाघोबा असतो,
निराशेचे ढग हटवून, झाले गेले विसरून जाऊ,
आज रात्रीच्या शुभ्र प्रकाशात, जोडीदाराला आनंद देऊ…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

✐ शरदाचे चांदणे,
आणि कोजागिरीची रात्र..
चंद्राच्या मंद प्रकाशात,
जागरण करू एकत्र..
दूध साखरेचा गोडवा,
नात्यांमध्ये येऊ दे..
आनंदाची उधळण,
आपल्या जीवनी होऊ दे…
आपल्या सर्वांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

✐ हा चंद्र तुझ्यासाठी
ही रात्र तु्झ्यासाठी
आरास ही ताऱ्यांची
गगनात तुझ्याचसाठी
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

✐ मंद प्रकाश चंद्राचा
त्यात गोड स्वाद दुधाचा
विश्वास वाढू द्या नात्यांचा
त्यात गोडवा असू दे साखरेचा
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

✐ आज कोजागिरी पौर्णिमा
आजचा दिवस तुम्हाला खूप सुखकारक
आनंदाची उधळण करणारा जावो हीच सदिच्छा
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

✐ कोजागिरीचे जागरण हे जीवनातील सकारात्मकतेचे,
सौम्यतेचे, सौंदर्यनुभवाच्या सजगतेचे कारण बनणे
हीच या उत्सवाची सार्थकता
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

✐ चंद्राच्या साक्षीने मिळाली बासुंदीची मेजवानी
कोजागिरीच्या रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

✐ कोजागिरी म्हणजे जागरूकेता वैभव,
उल्हासाचा आणि आनंदाचा उत्सव
शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरुप
समन्वयाची अनुभूती.
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

✐ कोजागिरी पौर्णिमेची रात्र लखलखते
दूधात देखणे रूप चंद्राचे दिसते
या शरद पौर्णिमेच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!

✐ शरदाचं टिपुरं चांदणं, कोजागिरीची रात्र
चंद्राच्या मंद प्रकाशात, करू जागरण एकत्र
मसाले दूधाचा गोडवा, नात्यांमध्ये येऊ दे
आनंदाची उधळण, आपल्या जीवनातही होऊ दे
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

✐ कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात
सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य
घेऊन येणारी ठरो! हीच आमची कामना
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

✐ मंद प्रकाश चंद्र-चांदण्यांचा
सोबतीला आस्वाद गोड दुधाचा,
विश्वास वाढु द्या नात्यांचा
सोबत गोडवा असू द्या साखरेचा,
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

✐ चंद्राच्या साक्षीने मिळाली मसाले दुधाची मेजवानी
कोजागिरी रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a comment