Shubh Sakal Anmol Suvichar

शुभ सकाळ अनमोल सुविचार

✐ आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो: जो स्वतःला विसरून
इतरांना आनंदित करतो.
शुभ सकाळ

✐ आयुष्य नावाची स्क्रीन जेव्हां
लो बॅटरी दाखवते आणि
नातेवाईक नावाचा charger मिळत नाही,
तेव्हां powerbank बनून जे तुम्हांला वाचवतात ते म्हणजे
मित्र
शुभ सकाळ

✐ !! शुभ सकाळ शुभ दिन !!
प्रत्येक हृदयात थोडेसे दुख: असते, फरक फक्त एवढा आहे..
काही जण आपली दुख डोळ्यातील अश्रू मध्ये ते लपवतात,
तर काही जण आपल्या हास्यामध्ये.

✐ मनाला जिंकायचे असते, “भावनेने”
रागाला जिंकायचे असते, “प्रेमाने”
अपमानाला जिंकायचे असते, “आत्मविश्वासाने ”
अपयशाला जिंकायचे असते, “धीराने”
संकटाला जिंकायचे असते, “धैर्याने”
माणसाला जिंकायचे असते, “माणुसकीने”
शुभ सकाळ

✐ !! शुभ सकाळ शुभ दिन !!
आनंद हा एक भास आहे, ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे.
दु:ख हा एक अनुभव आहे ,जो आज प्रत्येकाकडे आहे.
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो, ज्याचा स्वत:वर गाढ विश्वास आहे.

✐ ह्रदयापेक्षा सर्वात चांगली सुपीक जागा कुठेही नाही.
कारण इथे काहीही पेरलं का लगेचच उगवतं म्हणून….
पेरण्यापूर्वी विचार करावा मग ते प्रेम असो मैत्री असो
किंवा कोणावरचा राग वा द्वेष.
शुभ प्रभात

✐ जो मैदानात ठरलाय तो परत जिंकू शकतो,
परंतु जो मनाने हरला आहे तो कधीच जिंकू शकणार नाही,
आपला आत्मविश्वास हाच आपला सर्वात मोठा ठेवा आहे,
त्यास डळमळू देऊ नका,
यश नक्कीच तुमचं आहे.
शुभ सकाळ

✐ प्रातः प्रणाम
माझ्या प्रार्थनेचा असा स्वीकार कर हे देवा,
जेव्हा जेव्हा मी नतमस्तक होईल
प्रत्येक नात्यांचे जीवन सावरावे.

✐ शुभ सकाळ
जीवन सर्वांसाठी सारखेच असते,
फरक फक्त एवढाच असतो,
कोणी मनासारखं जगात असतं आणि
कोणी दुसरायच मन जपून जगात असतं !

✐ शांत स्वभावाचा माणूस हा
कधीही कमजोर नसतो…
कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ
असे काहीच नाही…
पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर
भले भले डोंगर हि फोडून निघतात…
माणसे कमविण्यात जो आनंद आहे,
तो पैसा कमविण्यात नाही..
शुभ सकाळ

✐ शुभ सकाळ शुभ दिन
दुरावा कोणतंही नातं संपवत नाही
आणि जवळीक कोणतंही नातं
घट्ट करत नाही.
तर नात्यांची घेतलेली काळजी
आणि केलेला सन्मान यामुळे नातं
अधिक मजबूत होतं आणि टिकतं
देखील.
जिवन खुप सुंदर आहे फक्त
तसं जगायला हवं…!!

✐ शुभ सकाळ
स्वतासाठी सुंदर घर करणे
हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण….
एखाद्याच्या मनात घर करणे,
यापेक्षा सुंदर काहीच नसते…

✐ ध्येय असे पाहिजे की
ज्या दिवशी तुम्ही हराल
त्या दिवशी जिंकणाऱ्या पेक्षा चर्चा
तुमची झाली पाहिजे..!!
।।शुभ सकाळ ।।

✐ जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.
शुभ सकाळ

✐ !! शुभ दिन शुभ सकाळ !!
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी.
मराठी माणसाला काय येते
मराठी माणसाला भारतीय राज्यघटना लिहिता येते.
मराठी माणसाला पहिला Indian Idol बनता येते.
मराठी माणसाला पहिला करोडपती बनता येते.
मराठी माणसाला पहिली नच बलिये विनर बनता येते.
मराठी माणसाला स्वराज्य उभं करता येते.
मराठी माणसाला भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवता येते.
मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा होता येतं.
मराठी माणसाला महासंगणक बनविता येतो.
मराठी माणसाला पार्श्वगायनात सम्राज्ञी बनता येतं.
मराठी माणसाला संपूर्ण भारतात पहिली मुलींची शाळा काढता येते.
मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येतं.
मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर बनता येतं.
मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं.
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी.
अभिमान बाळगा ‘मराठी’ असल्याचा.

✐ आपल्याला जे लोक आवडतात, त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा….
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करायला शिका,
आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते अजून सुंदर बनवायला शिका ..!!!
शुभ प्रभात

Leave a comment