Independence Day Marathi Messages

Independence Day Marathi Messages
✐ स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

✐ जयोस्तुते जयोस्तुते
श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती
त्वामहं यशोयुतां वंदे
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

✐ स्वातंत्र्याची ध्वजा फडकते,
सूर्य तळपतो प्रगतीचा
भारतभूमीच्या पराक्रमाला
महाराष्ट्राचा मुजरा..
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

✐ आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली
जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे
हा देश अखंड राहिला…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

✐ देश आपला सोडो न कोणी..
नातं आपलं तोडो न कोणी…
हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे…
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

✐ ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा…
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

✐ मनात ठेवू नका द्वेष,
मनातून काढून टाका हा द्वेष,
ना तुमचा ना माझा,
ना त्याचा ना कुणाचा
हा देश आहे आपल्या सर्वांचा.
जय हिंद जय भारत.

✐ देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग
आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…
वंदे मातरम्.

✐ निशान फडकत राही
निशाण झळकत राही
देशभक्तीचे गीत आमुचे
दुनियेत नि‍नादत राही
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

✐ आमचे स्वातंत्र्य स्मरण देतो
अनेकांच्या बलिदानाचे
त्याचे राखणे पावित्र्य
कर्तव्य असे आमुचे

✐ तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणे किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

✐ ज्यांनी लिहिली
आझादीची गाथा
त्यांच्या चरणी
ठेवितो माथा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

✐ रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

✐ या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग
वंदन करुनिया तयांसी आज
ठेऊनी त्यांच्या बलिदानाची जाण
करूया भारतदेशा असंख्य प्रणाम..
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

✐ उत्सव तीन रंगाचा
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी भारत देश घडवीला !
ज्यांनी लिहिली आझादीची गाथा,
त्यांच्या चरणी ठेविते माथा

✐ “विचारांचं स्वातंत्र्य , विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा… चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…”

✐ “आम्ही या देशाची तरुण पिढी शपथ घेत आहोत.. कि आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत; आतंकवाद, भ्रष्टाचाराशी लढत राहूत… आम्ही आमच्या भारत मातेचं संरक्षण करत राहूत. जय हिंद….जय भारत..!!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…”

Leave a comment