Children’s Day Bal Diwas Messages Wishes In Marathi

बालदिन मराठी शुभेच्छा संदेश

✐ बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण..
बालपणी होते सर्व सुखाचे धन..!!
बालपणीच्या आठवणीत हरपते मन..
येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण.

✐ वयाने मोठे पण मनाने लहान असलेल्या
प्रत्येकाला बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

✐ टीचर टीचर आज आम्हाला काहीच म्हणू नका…आज आम्ही खूप धमाल करू…वर्षभर आम्ही तुमचं ऐकतो आज…आम्ही आमचं तुम्हाला सांगू..हॅपी चिल्ड्रन्स डे.

✐ ना सकाळची चिंता होती ना संध्याकाळची, थकून शाळेतून यायचं पण पळत खेळायला जायचं. असं होतं बालपण, बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

✐ ना रडण्याचं काही कारण नव्हतं…ना हसण्याचा काही बहाणा होता…का आम्ही झालो मोठे…यापेक्षा चांगला तर बालपणीचा काळ होता. Happy Childrens Day

✐ लहान मुलंही देवाची सुंदर कलाकृती आहेत.
बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

✐ बालपण हा असा खजिना आहे जो पुन्हा मिळणं अशक्यच. खेळणं, धिंगाणा आणि खाण्यापिण्याची धमाल…बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

✐ बालपण हरवले म्हणून खंत करत बसू नका,
हसा, रडा, पळा, धडपडा, उडया मारा, खेळा,
उगीचच मोठे झालो हे मनावर ओढवून
घेतलेले बंधन झुंगारून द्या..
लक्षात घ्या हे जग आपल्यासाठी आणि आपल्यामुळे आहे,
आपण जगासाठी नाही..
शाळेतल्या दप्तरासारखे अख्ख्या जगाचे ओझे
आपल्याच पाठीवर आहे असे वागू नका..
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
Happy Childrens Day To All !!!

✐ आम्ही आहोत भारतातील मुलं, आम्ही नाही अक्कलेची कच्ची, ना आम्ही वाहतो अश्रू, कारण आम्ही आहोत सरळ साधी आणि खरी.

✐ लहानपणापासून विचारण्यात आलेला एक प्रश्न : मोठं होऊन काय बनायचं आहे? आता कळतं त्याचं उत्तर पुन्हा एकदा लहान व्हायचं आहे.
लहान पणी सगळेच विचारायचे तुला काय व्हायचंय?
पण उत्तर कधी सापडलेच नाही..
आज जर कोणी विचारले ना तर उत्तर एकच असेल,
मला पुन्हा लहान व्हायचंय…
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

✐ देशाच्या प्रगतीचे आधार आहेत मुलं…आम्ही एकत्र येऊन साकार करू चाचा नेहरूंची स्वप्नं.
आज आहे चाचा नेहरूंचा वाढदिवस…सर्व लहान मुलं एकत्र येऊ…चाचाजींच्या आठवणीत वातावरणाला आम्ही मुलं सुगंधित करू.
चाचांचा जन्मदिवस आहे आज सर्व मुलं येतील, चाचाजींना गुलाब वाहून सारा परिसर सुगंधित करतील Happy Children’s Day

✐ कागदाची नाव होती,
पाण्याचा किनारा होता,
मित्रांचा सहारा होता,
खेळण्याची मस्ती होती,
मन हे वेडे होते,
कल्पनेच्या दुनियेत जगत होतो,
कुठे आलो या समजूतदारीच्या दुनियेत,
या पेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते…
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

✐ चला आपल्या जगातील या चिमुकल्यांच्या आनंदासाठी एक सुरक्षित जग बनवूया. बालदिनाच्या शुभेच्छा.
तुम्हाला पाठवत आहे शुभेच्छांचा गुच्छ…प्रेमाने भरलेला तुमचं आयुष्य सुगंधित करण्यासाठी…आनंदी राहा आणि आठवणी जपा…बालदिनाच्या सुंदर शुभेच्छा.

✐ फक्त मुलांनाच हा विश्वास असतो की, ते सर्वकाही करू शकतात. अशा निरागस मुलांना बालदिनाच्या गोड शुभेच्छा
काही वेळा शाळा बुडवणं आणि मित्रांसोबत वेळ घालवणं चांगल असतं. कारण आता मागे वळून पाहिल्यावर कळतं की, शाळेतले मार्क नाहीतर अशा आठवणी जास्त हसवतात. या दिवशी प्रत्येक बापाला आपल्या मुलाची आठवण येते आणि म्हणूनच मला तुझी आली. Happy Baldiwas

✐ मुलांना शिकवा श्रीमंत होण्यासाठी नाहीतर आनंदी राहण्यासाठी. ज्यामुळे त्यांना कळेल वस्तूचं मूल्य त्यांची किंमत नाही. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

✐ विना शांती सर्व स्वप्न विरून जातात आणि राख बनतात. मुलांचंही तसंच आहे त्यांना शांतपणे समजवल्यास ती घडतात नाहीतर….बालदिनाच्या शुभेच्छा.

✐ जगातील सर्वात चांगला वेळ, जगातील सर्वात चांगला दिवस, जगातील सर्वात सुंदर क्षण फक्त बालपणीच मिळतात. Happy Children’s Day.

✐ मुलांमध्ये दिसतो देव, चला देवाची ही कलाकृती साजरी करूया Happy Children’s Day.

✐ प्रत्येक पर्वत चढा, प्रत्येक झऱ्यात भिजा, प्रत्येक इंद्रधनुष्याला गवसणी घाला जोपर्यंत तुमचं स्वप्नं मिळत नाही. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a comment