Diwali Messages In Marathi

Diwali Messages In MarathiDownload Image
गोवर्धन पूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंद, उत्साह अन हर्षउल्लासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला,
दिवाळीच्या तुम्हांला मनःपूर्वक शुभेच्छा!

दिवे राहो तेवत, तुम्हीही राहा झगमगाटात, तुम्ही आमची आम्ही तुमची ठेवू आठवण,
जोपर्यंत आहे आयुष्य तोपर्यंत हीच आहे देवाकडे प्रार्थना..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

दिवाळीची लाईट, सगळ्यांना करो डिलाईट,
पकडा मस्तीची फ्लाईट, धमाल करा ऑल नाईट… हॅपी दिवाळी

जेव्हा होईल प्रदूषणमुक्त दिवाळी, तेव्हा होईल सगळीकडेच खुशाली,
जेव्हा होतो पणत्यांनी उजेड तर कशाला हवा फटाक्यांचा पसारा.

दिवाळीची शान तेव्हाच आहे जेव्हा गरीबांची मुलंही लावतील फुलबाज्या,
त्यांच्याकडेही असेल मिठाई, जोपर्यंत दूर होणार नाही हा भेदभाव
तोपर्यंत कशी होईल दिवाळीची खरी रोषणाई…
सर्वांना करून आनंदी मगच साजरी करा दिवाळी.

दिवाळीत खूप खाऊया मिठाया, मित्रांना बोलवूया, शेजाऱ्यांच्या दरवाज्यांवरही लावूया पणत्या,
सर्वांना मारू मिठी, लक्ष्मीची करू आरती, सर्वांना हॅपी दिवाळी.

दीपावलीत नको फक्त फटाके, ईर्षेलाही जाळूया, सगळीकडे स्वच्छता करून पर्यावरणाला स्वच्छ ठेवूया.

दीपावली असा आहे सण, जो येतो बऱ्याच काळानंतर वर्षातून एकदा.
चला मस्तपैकी करू फराळ आणि खाऊ मिठाई, तुम्हा सर्वांना दीवाळीच्या खूप खूप शुभेच्छा…

दिवाळी काढा सुंदर रांगोळी, विसरा अस्वच्छता आणि भ्रष्टाचाराचाही करा नाश,
वाईट सवयी टाळा आणि करा चांगल्या गोष्टींना सुरूवात. हॅपी दिवाळी.

सदा राहिलात हसतमुख तर रोजच आहे दिवाळी, तुमचा खिसा न होवो कधी रिकामा,
मग भले येवो कितीही तंगी, मित्रांच्या आयुष्यात राहो सदैव खुशाली तेव्हाच असेल माझी खरी दिवाळी.
हॅपी दिवाळी.

यंदाच्या दिवाळीत टाळा नाहक खर्च, फक्त करा सेव्हिंग्ज्स, भविष्य करा साकार,
प्रत्येक दिवाळीचा हाच असावा निर्धार.

दिवाळी आहे चला या दिवसाला बनवूया खास, डाएट वगैर विसरा आणि फराळाचा घ्या आस्वाद,
पण हे करताना मित्रांंना शुभेच्छा द्यायला विसरू नका दिवाळीचा सण आहे खास.

दिवाळीच्या नादात पाकिटाचाही करा विचार, फालतू खर्च होणार नाही यावर करा विचार,
पण असं असलं तरी करू नका कंजूषी यार, दिवाळी आहे धूमधडाक्यात साजरी करूया यार.
हॅपी दिवाळी.

दिवाळीत खाऊया मिठाई भरपूर, मित्रांना भेटू वेळ घालवू एकत्र भरपूर, शुभ दिवाळी

न राहो एकही दार दिव्यांविना, शेजाऱ्यांकडेही लागू दे दिवा,
सगळ्यांशी करूया गळाभेट दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

This picture was submitted by Smita Haldankar.

See More here: Diwali Marathi

Tag:

More Pictures

  • Happy Diwali Messages In Marathi
  • Happy Diwali Wishes In Marathi
  • Diwali Shubhechha In Marathi
  • Happy Diwali Shubhechha In Marathi
  • Happy Diwali Status In Marathi
  • Happy Diwali Quotes In Marathi
  • Happy Diwali Wishes In Marathi
  • Diwali Message Greeting In Marathi
  • Diwali Marathi Wish Image

Leave a comment