Friendship Day Wishes In Marathi

Friendship Day Wishes In MarathiDownload Image
मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,
मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती
माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे…
मैत्री दिनाच्या शुभेच्छा !

हजार शब्दात जे सांगता येत नाही ते एका शब्दात कळणं म्हणजे मेैत्री
– मैत्री दिनाच्या शुभेच्छा

मैत्री ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी असावी
एकाने गरीबीतही स्वतःचा कधीच स्वाभिमान सोडला नाही
आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही.

जिथे बोलण्यासाठी शब्दाची गरज नसते,
दुःख व्यक्त करण्यासाठी आसवांची गरज नसते त्यालाच मैत्री म्हणतात
– मैत्री दिनाच्या शुभेच्छा

खऱ्या मैत्रीशिवाय आयुष्याला अर्थ नाही.

जन्म हा थेंबासारखा असतो
आयुष्य ओळीसारखं असतं
प्रेम त्रिकोणासारखं असतं
मैत्री मात्र वर्तुळासारखी असते
कारण, मैत्रीला शेवट नसतो.

ज्याचे मन आहे पवित्र तोच तुमचा खरा मित्र

जिथे शब्दावाचून मन वाचता येते ती खरी मैत्री

निखळ मैत्रीचे धन असेल तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात
– मैत्री दिनाच्या शुभेच्छा

चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री ही ऊसासारखा असते.
तुम्ही त्याला कितीही तोडा, घासा, पिरघळा त्यातून गोडवाच बाहेरयेतो.

मैत्री म्हणजे निसर्गाने माणसाला दिलेली अनमोल देणगी – मैत्री दिनाच्या शुभेच्छा

प्रेम असो वा मैत्री ह्रदयापासून केली तर आपण त्यांच्याशिवाय एक मिनीटही राहू शकणार नाही.

मित्र परिसासारखे असतात त्यांच्या सहवासानेच आयुष्याचं सोनं होतं
– मैत्री दिनाच्या शुभेच्छा

आपला तर कोणी मित्र नाही
जे आहेत ते सगळे काळजाचे तुकडे आहेत

चांगला दोस्त चिडला तर त्याला कधीच वाऱ्यावर सोडू नका
कारण तो असा हरामी असतो ज्याला आपल्या सगळ्या गोष्टी माहीत असतात

दोस्ती कधी स्पेशल लोकांसोबत होत नाही
ज्याच्यासोबत होते तेच स्पेशल होऊन जातात

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Friendship Day Quote In Marathi
  • Friendship Day Message In Marathi
  • Friendship Day Shayari In Marathi
  • Friendship Day Messages In Marathi
  • Friendship Day Image In Marathi
  • Friendship Day Quotes In Marathi
  • Friendship Day Suvichar In Marathi
  • Friendship Day Greeting In Marathi For Your Best Friend
  • Happy Friendship Day Message In Marathi

Leave a comment