Good Morning Relationship Quotes In Marathi ( गुड मॉर्निंग नात्यांवर मराठी कॉटस )

Good Morning Relationship Quotes In MarathiDownload Image
गुड मॉर्निंग
नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. ,
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात.,
तर आयुष्यभर एकटे राहाल.

नाती जोडणं सोपं असतं, पण नाती निभावणं कठीण असतं.

स्वच्छ मनाच्या माणसांना नेहमीच रिलेशनशिपमध्ये धोका मिळतो

आपल्या आत्मसन्मानाशी तडजोड करून कोणीही वारंवार नातं निभावू नये.

काही नाती आपला भ्रम असतात आणि काही नाती आपल्या भ्रमाचा भोपळा फोडतात.

प्रेम आणि विश्वासाशिवाय कोणतंही नातं दीर्घकाळापर्यंत टिकत नाही.

कोणतंही relationship परफेक्ट नसतं कारण प्रत्येक नात्यात चढ-उतार हे ठरलेलेच असतात.

आपण कधीतरी त्या व्यक्तीला विसरून जातो, जी जगात सगळ्यात जास्त आपल्याला मानत असते.

जर तुम्हाला एखाद्याशी दीर्घ काळापर्यंत नातं टिकवायचं असेल तर त्याच्याशी समोरासमोर तुमच्या तक्रारी व्यक्त करा.

चांगले संबंध हे तुटू शकतात पण विसरता येत नाहीत.

कोणतंही नातं तोडण्याआधी एकदा थंड डोक्याने विचार नक्की करावा.

एका चांगल्या relationship मध्ये आपण समोरच्या व्यक्तीला त्याच्यातील गुण-दोषांसकट स्वीकार करतो.

जेव्हा नात्यांमध्ये दुरावा येईल तेव्हा तो प्रेमाने दूर करावा. नाहीतर तो दुरावा वाढतच जातो.

सर्वात चांगल्या रिलेशनमध्ये दोन व्यक्ती काहीही न बोलता एकमेकांच्या मनातल समजून घेतात.

आजकाल लोक त्यांच्याशीच नाती जोडतात आणि निभावतात, ज्यांच्याकडून त्यांच्या स्वार्थाची पूर्ती होणार असते.

एकतर्फी संबंध कधीही जास्त काळ निभावता येत नाहीत.

ती नाती अनमोल असतात, जिथे समोरची व्यक्ती कोणत्याही अपेक्षेविना तुमची सोबत करते.

गैरसमज ही किड आहे जी नात्याला हळूहळू पोखरून टाकते. म्हणून कधीही गैरसमज असल्यास लवकरात लवकर दूर करावेत.

अंधविश्वास कधीही चांगला नसतो. ही गोष्ट नात्यांनाही लागू होते. त्यामुळे कोणत्याही नात्यावर आणि कोणावरही अंधविश्वास ठेवू नये.

चांगल्या आणि खऱ्या नात्यांना ओळखण्याची कला शिका. ही छोटीशी गोष्ट तुमचं आयुष्य सुखकर बनवेल.

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Good Morning Alone Quotes In Marathi
  • Good Morning Life Quotes In Marathi
  • Good Morning Love Quotes In Marathi
  • Good Morning Motivational Marathi Quotes
  • Good Morning Marathi Quote On Ambition
  • Good Morning Marathi Happiness Quotes
  • Good Morning Marathi Quotes On Life
  • Good Morning Quote In Marathi

Leave a comment