Happy Navratri Messages In Marathi

Happy Navratri Messages In Marathi
नवरात्रोत्सवाच्या आपणास व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
आई जगदंबेच्या कृपेने आपणास
उत्त्तम आरोग्य, सुख, शांती, समाधान लाभो
हीच आई भवानी चरणी प्रार्थना !
शुभ नवरात्री

विश्व जिला शरण आले त्या शक्तीला शरण जाऊया…
नवरात्रीच्या मंगल दिनी भवानीचे स्मरण करू या
नवरात्रीच्या शुभेच्छा

शरद ऋतूत रंगत असे
उत्सव नवरात्रीचा
ओसंडून वाहू दे आपल्या आयुष्यात
पूर नाविन्य आणि आनंदाचा
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

अंबा मातेची नऊ रुपं तुम्हांला
कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन,
शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती
आणि शांती देवो!
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

नारी तू नारायणी, नारी तू सबला तुझ्या तेजाने उजळे सृष्टी,
नमितो आम्ही तुजला. शुभ नवरात्री!

नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा!
लक्ष्मीचा वरदहस्त सरस्वतीची साथ
माता दुर्गेच्या आशीर्वादाने
तुमचे जीवन होवो आनंदमय
नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
नवरात्र उत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

शरदात रंग तसे,
उत्सव नवरात्रीचा
ओसांडून वाहूदे आपल्या जगतात,
महापूर नाविण्याचा अन् आनंदाचा
घटस्थापना व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

अंबा, माया, दुर्गा, गौरी
आदिशक्ती तूच सरस्वती
सकल मंगल माझ्याच घटी
विश्वाची स्वामिनी जगतजननी
नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!

नव कल्पना
नव ज्योत्सना
नव शक्ती
नव आराधना
नवरात्रीच्या या पावन पर्वावर
पूर्ण होवोत आपल्या सार्‍या मनोकामना
शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवरात्रीच्या मंगल पर्वावर माता देवी तुम्हाला सुख, समृद्धी,
सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, हीच प्रार्थना…
शुभ नवरात्री!

घरात चालती बोलती लक्ष्मी पाणी भरते आहे,
अन्नपूर्णा होऊन भोजन बनवत आहे,
गृहलक्ष्मी होऊन कुटुंबाला सांभाळते आहे,
सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेत आहे,
दुर्गा होऊन संकटांशी सामना करत आहे,
कालिका, चंडिका होऊन घराचे रक्षण करत आहे,
तिची पूजा नको पण स्त्री म्हणून सन्मान व्हावा,
यंदा देवी फक्त देव्हाऱ्यात नाही तर मनातही बसवा,
मूर्तीसोबत घरच्या लक्ष्मीचाही आदर करा,
हेच आहे नवरात्रौत्सवाचे सार
शुभ नवरात्री !

उदो बोला उदो… अंबाबाईचा उदो… नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा….
आई अंबाबाईची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो

जन्माोजन्मी तुम्हाला आईच्या भक्तीचे सौभाग्य लाभो हीच देवीचरणी प्रार्थना…
शुभ नवरात्री !

उपवास करून मन करा पवित्र
आईच्या भक्तीत बदलून जाईल सर्व
श्रद्धेचं फूल वाहण्याचं हे आहे पर्व
जय अंबे जय दुर्गा

नव कल्पना
नव ज्योत्स्ना
नव शक्ती
नव आराधना
नवरात्री पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा

आई दुर्गेकडे प्रार्थना आहे की,
बल, बुद्धी, ऐश्वर्य, सुख आणि संपन्नता प्रदान कर
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

आईच्या आराधनेचं पर्व आहे
आईच्या नवरूपांचं पर्व आहे
अडकलेली काम पूर्ण होण्याचं पर्व आहे
भक्तांच्या सुख-समृद्धीचं पर्व आहे
नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Happy Navratri Greetings In Marathi
  • Happy Navratri Wish In Marathi
  • Happy Navratri Wishes In Marathi
  • Navratri Marathi Shubhechha
  • Navratri Utsav Marathi Quote
  • Shubh Navratri Marathi Wishes
  • Navratri Chya Marathi Shubhechha
  • Navratri Ghatasthapana Marathi Shubhechha
  • Shubh-navratri

Leave a comment