Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Best Marathi Suvichar Quotes Images ( बेस्ट मराठी सुविचार इमेजेस )
अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे,
तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा.
सगळे जग हाच तुमचा देश आहे.
त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.
सूक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखु देत नाही.
तो सोडता आला कि झालं.
श्वास व विश्वास दोन्ही अदृश्य आहेत
परंतु दोघात इतकी ताकद आहे कि
अशक्य गोष्टीला शक्य बनवून देतात.
आपल्या प्रतिष्ठेचा खूप चांगला सांभाळ करा कारण हीच आहे,
जिच वय तुमच्यापेक्षा जास्त आहे.
बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य आणि
स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य !
पृथ्वी वरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा
विवेक रुपी वृक्षांची छाया अधिक शीतल असते.
कर्माचे फळ
माणूस जे कर्म करतो त्याचे फळ देण्याची व्यवस्था निसर्गाने त्या कर्मातच करून ठेवलेली आहे. परिणामी विशिष्ट परिस्थितीत प्रामाणिकपणे काम करून सुद्धा जरी यश मिळाले नाही तरी हताश होण्याचे कारण नाही.
श्रद्धेची मुळे हृदयात असतात,
जिभेच्या टोकावर नसतात.
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर
आपण काय आहोत? यापेक्षा
आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा,
जगात अशक्य काहीच नसतं.
असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात.
तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते,
त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो
आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही पर्वा भीती नसते.
वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं..
आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts