Marathi Sad Shayari

✐ शब्द तर अंतरीचे असतात,
दोष माञ जिभेला मिळतो.
मन तर स्वतःचच असतं.
झुरावं माञ दुसऱ्यासाठी लागतं.
ठेच तर पायाला लागते
वेदना माञ मनाला होतात.
आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं.
असच नात जपत जगण,
हेच तर खरं जीवन असतं

✐ विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही!
दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही !
पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही !
आठवण आली नाही असं कधी झालच नाही !
आठवायला विसराव लागत विसरता माञ आलच नाही..

✐ साकारलेल्या त्या भावनांना का आज शब्दच नाहीत ?
का त्या डोळ्यांमध्ये माझी एक ओळखही नाही

✐ वाहत्या वार्याला सखे मुठीत धरायला जाऊ नको
प्रेमाच्या विषारी बीजाला हॄदयात पेरायला जाऊ नको

✐ शेक्सपियर म्हणतो…
तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार..
दोन्ही माझ्याच पक्षात येईल.
जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल..
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…

✐ वाट पाहता पाहता तुझी ,
संध्याकाल ही टळुन गेली.
तो पर्यंत सोबत होती सावली माझ्या,
पण तिही मला एकटे सोडून पळुन गेली ..

✐ वाळूवरच तुझ नाव लाटांनी येऊन पुसल
माझ्या मनावरच त्यांना कस पुसता येईल
अश्रुंच्या थेंबानी जे लिहील आहे
ते सहज कस कोणाला वाचता येईल

✐ हरवलेल्या गोष्टींच्या शोधात वेडे मन इतके धावले
की गवसलेल्या गोष्टींचा पायाखाली चुराडा झाल्याचे
कळलेही नाही.
काही तुडवलेल्या गोष्टींना इतका तडा गेला आहे
कुठला तुकडा कोणाचा हे सुद्धा आता ओळखू येत
नाही.सहवासाच्या खेळामधल्या
आठवणी आहेत मागे आसवांच्या ओंजळी शिवाय
हाती काहीच न लागे.

Leave a comment