Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Promise Day Quotes In Marathi For Friends
Download Image
1. कधी कोणाला वचन देईन असं वाटलंही नव्हतं.
पण काय करणार तुझ्यासारखी मैत्रीण मला गमवायची नाहीये.
त्यामुळे आयुष्यभर ही मैत्री अशीच निभावेन
हे माझ्याकडून तुला वचन.
वचन दिवस शुभेच्छा
2. कदाचित ही वेळ कायम अशीच राहणार नाही,
जसे आज आपण एकत्र आहोत तसे आपण उद्या एकत्र असूच असंही नाही.
मैत्री मात्र कायम राहील. भेटू अथवा न भेटू …
मनात ही ज्योत उमलतच राहील.
वचन आहे कायमच्या या मैत्रीचं.
3. आपण नशिबानेच भेटलो,
आपण एकमेकांशी बोलायला लागलो
हे कदाचित आपल्या नशिबात लिहून ठेवलं असेल.
इतक्या वर्षांनी आजही आपली मैत्री आपण टिकवून ठेवली आहे
आणि ती कायम तशीच राहील हे मात्र वचन आहे तुला.
काहीही होवो आपली मैत्री कधीही तुटणार नाही
4. कोणतीही परिस्थिती येवो,
आपल्यामध्ये कधीही कोणाला मी येऊ देणार नाही.
माझ्यावर तुझा कायम हक्क असेल हे माझं वचन आहे तुला.
आपली मैत्री अशीच निखळ राहील.
5. रक्ताच्या नात्यापेक्षा मला आपल्या मैत्रीचं नाते अधिक महत्वाचे आहे
आणि त्याचं कारण म्हणजे तुझं माझ्यावर असलेले अतोनात प्रेम.
तुझ्यासारखा मित्र फारच भाग्यवान लोकांना मिळतो आणि
अशा भाग्यवान लोकांपैकी एक मी आहे.
ही मैत्री कधीही तुटू देणार नाही माझं वचन आहे तुला.
6. मैत्रीची एक गोष्ट चांगली असते की यामध्ये कोणत्याही मागण्या नसतात. पण तरीही मला तुला वचन द्यायचं आहे की ही मैत्री मी कायम निभावेन – Happy Promise Day
7. आपण नेहमीच खरे मित्र होतो, आहोत आणि राहू. त्यासाठी वेगळं वचन द्यायची अथवा घ्यायची गरज नाही हे मला माहीत आहे. पण कधी कधी भावना बोलून दाखवल्या तरी त्यातील खोलपणा जाणवतो आणि म्हणूनच आपली मैत्री कायम अशीच राहावी यासाठी मी तुला वचन देत आहे.
8. वचन आहे की ही मैत्री मी कायम अशीच निभवेन, तुला कायम असंच छळत राहीन, दिवस असो रात्र असो कायम तुला त्रास देत राहीन. पण तितकंच तुझ्यावर प्रेम करेन आणि तुझी काळजी घेईन
9. मैत्री हा शब्दच एक प्रकारचं वचन आहे. ती जेव्हा तुझ्याशी केली तेव्हाच वचनबद्ध झालो.
10. आज स्वतःलाच एक वचन देत आहे. आयुष्यात कितीही नवे मित्रमैत्रिणी येवोत पण जुन्या मित्रमैत्रिणींना कधीही सोडणार नाही आणि विसरणार नाही
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts