Dussehra Messages In Marathi

Dussehra Messages In MarathiDownload Image
उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दसऱ्याचा सण आणि सुवर्णाचे दान
सुर्वण म्हणून आपटयाा पानाचा मान,
झेंडुच्या फुलांनाही महत्व फार
त्याच्या तोरणांनी सजले प्रत्येकाचे दार…
दसऱ्याच्या शुभेच्छा!

तोरण बांधू दारी..
रांगोळी रेखू अंगणी..
उधळण करु सोन्याची…
नाती जपू मना-मनांची
विजयादशमीच्या शुभेच्छा!

कष्टाचं मोल सरत नाही
ते आयुष्यभर टिकतं
म्हणूनच कदाचित खरं सोनं काळ्या मातीमध्ये मिळतं.
दसऱ्याच्या शुभेच्छा!

झेंडूची तोरण आज लावा दारी
सुखाचे किरण येऊद्या घरी
पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा
विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

अज्ञानावर ज्ञानाने
शत्रुवर पराक्रमाने..
अंधारावर प्रकाशाने
क्रोधावर प्रेमाने
विजय मिळवण्याचा सण म्हणजे विजयादशमी! दसरा शुभेच्छा.

परक्यांना ही आपलसं करतील असे गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतात
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच
सदैव असेच राहा
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा!

चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा!!
आपुलकीच्या साखरेचा स्वाद करा!!
तुमचा चेहरा आहेत हसरा!!
उद्या सकाळी खूप गडबड,
म्हणून तुम्हाला आताच म्हणतो, शुभ दसरा!!

झेंडूची फुले केशरी,
वळणा वळणाचं तोरण दारी,
गेरुचा रंग करडा तपकिरी,
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
कृतकृत्याचा कलश रुपेरी,
विजयादशमीची रीत न्यारी
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरुपी अहंकाराचा नाश करत
दसरा साजरा करुया
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

रम्य सकाळी,
किरणे सोज्वळ अन सोनेरी
सजली दारी,
तोरणे ही साजिरी..
उमलतो आनंद मनी,
जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा,
मुहूर्त सोनेरी हा दसरा…
सोन्यासारखा तर तुम्ही आहातच
तसेच सदैव राहा,
आणि तुमची साथ अशीच शेवटपर्यंत राहू द्या.
तुम्हाला सर्वांना दसरा सणाच्या शुभेच्छा!

आला आला दसरा, टेन्शन सारे विसरा
चेहरा हसरा ठेवून सगळ्यांना द्या दसऱ्याच्या शुभेच्छा!

आपल्या यशाच्या आड येणाऱ्या सगळ्या सीमा पार होऊन
आपली आकांक्षा पुरती होवो हीच सदिच्छा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

स्नेहभाव वाढवू अनं प्रफुल्लित करु मन…
सुवर्ण पर्ण वाटायचे..
अन् सुवर्ण क्षण साठवायचे..
मनामध्ये जपून आपुलकी
एकमेकांना भेटायचे
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आज सोनियाचा दिनू… करु नव्या कामाची सुरुवात
दसरा आहे आज करु तो आनंदात, दसरा शुभेच्छा.
आज आहे दसरा शुभेच्छा दिन

ज्या दिवशी रामचंद्राने केला रावणाचा वध
दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.
जसा रामाने केला रावणाचा वध
त्याप्रमाणेच तुम्हीही आपल्यातील वाईटाचा करा वध
शुभ दसरा शुभेच्छा, शुभ विजयादशमी

दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा
प्रभू श्रीराम करो तुमच्या घरावर सुखाची बरसात
आमच्या शुभ दसरा शुभेच्छा करा स्वीकार

This picture was submitted by Smita Haldankar.

See More here: Dussehra Marathi

Tag:

More Pictures

  • Dussehra Status In Marathi
  • Dussehra Wishes In Marathi
  • Happy Dussehra Status In Marathi
  • Happy Dussehra Marathi Wish
  • Happy Dusshera Marathi Wish Picture
  • Happy Dussehra Marathi Wish Picture
  • Dussehra Marathi Status Image
  • Dussehra Marathi Message Photo
  • Dussehra Marathi Greeting Pic

Leave a comment