Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Shikshak Diwas Marathi Wishes Images ( शिक्षक दिन मराठी शुभकामना इमेजेस )
शिक्षक दिन
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्यां चा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
‘शिक्षक’ हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
जे आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवतात
आणि चांगल्या-वाईटाची ओळख करून देतात,
देशातील या निर्मात्यांना आम्ही करतो शत शत प्रणाम.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश…
माझ्या जीवनाची प्रेरणा आहे,
तुम्हीच माझे मार्गदर्शक आहात.
तुम्हीच माझ्या जीवनाचा प्रकाशस्तंभ आहात.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आम्हाला घडवण्यासाठी जी कठोर मेहनत
आणि प्रयत्न तुम्ही केले त्याबद्दल
आम्ही तुमचे सदैव ऋृणी राहू. हॅपी टीचर्स डे.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुरेव परंब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।।
माता गुरू आहे, पिताही गुरू आहे.
विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत.
ज्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं
त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत.
या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व गुरूजनांना
कोटी कोटी प्रणाम.
प्रिय टीचर,
तुम्ही फक्त एक टीचर नाही,
माझ्या जीवनातील प्रेरणा आहात.
आज मी आपणास जगातील
सर्वात बेस्ट टीचर घोषित करत आहे
आणि हा पुरस्कार देतो तुम्हाला.
शिक्षकदिनाच्या तुम्हाला
खूप खूप शुभेच्छा.
तुमच्यासारखा शिक्षक मिळणं
हे आशिर्वादापेक्षा कमी नाही.
माझं जग बदलण्यासाठी
खूप खूप धन्यवाद.
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक,
नेहमी विदयार्थ्याची प्रगतीच पहातो तो शिक्षक,
नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक,
नेहमीच घडतो अन घडवितो तो शिक्षक……
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सर आज तुमची कमी मला भासत आहे,
कारण तुमच्यामुळे मी घडलो आहे,
तुमच्यापुढे मी नतमस्तक झालो आहे,
मला आशीर्वाद द्या सर ही माझी इच्छा आहे…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शिक्षक ‘म्हणजे एक समुद्र ,
ज्ञानाचा, ……पवित्र्याचा,
एक आदरणीय कोपरा,
प्रत्येक व्यक्तीच्या मनातला……
शिक्षक अपुर्णाला पूर्ण करणारा…..
शिक्षक, शब्दांनी ज्ञान वढविणारा,
शिक्षक, जगण्यातुन जिवन घडवणारा,
शिक्षक तत्वातून मुल्ये फ़ुलवणारा…..
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts